औरंगाबाद : महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानाचे जुने ऐतिहासिक ठेवणीचे प्रवेशद्वार पाडण्यात आले आहे. उद्यानाच्या समोर भागात बीओटी तत्वावर मोठे शॉपींग कॉम्प्लेक्स उभारले आहे. त्यात जुने प्रवेशद्वार अडथळा ठरत असल्याने ते पाडण्यात आले. आता उद्यानात जाण्यासाठी शॉपींग कॉम्प्लेक्सच्या दरवाजाचा वापर केला जाणार आहे. तर उद्यानाची तिकिट खिडकी ही देखील बदलली असून मागील बाजूस बांधली गेली आहे.
पालिकेचे उद्यानात मराठवाड्यातील प्राणीसंग्रहालय आहे. त्यामुळे हे उद्यान मराठवाड्यासह बाहेरील पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले आहे. या ठिकाणी दररोज शेकडो लोक भेटी देतात. त्या देश, विदेशातील पर्यटकांचाही समावेश असतो. काही वर्षांपूर्वी सिद्धार्थ उद्यानासमोर आकर्षक असे ऐतिहासिक ठेवणीचे प्रवेशद्वार उभारण्यात आले. त्याच्या बाजूला तिकिट खिडकीची खोली बांधली गेली.
मात्र, आता हे प्रवेशद्वार आणि तिकिट खिडकीची खोली पालिकेने पाडली आहे. पालिकेने काही वर्षांपूर्वी उद्यानाची मुख्य रस्त्यालगतची जागा बीओटी प्रकल्पासाठी दिली. आता तिथे मोठे शॉपींग कॉम्प्लेक्स बांधले आहे. उद्यानाचे प्रवेशद्वार त्यात अडथळा ठरत असल्याने ते जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आले. आता शॉपींग कॉम्प्लेक्ससाठीच्या नवीन दरवाजातूनच उद्यानात जाण्यासाठी प्रवेश मिळेल. उद्यानाची तिकिट खिडकीची खोली देखील बदलली असून सध्याच्या जागेपासून दीडशे फूट आत बांधली गेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा; न्यायालयाची सरकारला कायदा करण्याचा सूचना
- गणेश मंडळांनी मतदार जनजागृती कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा; पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
- ‘मुंबईचे पाप काय, की त्यांना शिवसेनेसारखा पक्ष मिळाला’, निलेश राणेंनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ
- ‘उघड दार उद्धवा आता…’; मनसेचे मंदिरे उघडण्यासाठी पुण्यात जोरदार आंदोलन
- एसटी तिकीट यंत्र खरेदी गैरव्यवहार प्रकरणी आज लोकायुक्तांपुढे सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
