Share

राज्य सरकारला मोठा दणका ; हायकोर्टाने केली अकरावीसाठीची सीईटी परीक्षा रद्द

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा होणार असल्याचं राज्य सरकार कडून सांगण्यात आले होते मात्र आता 11 प्रवेशसाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्याचा महत्वाचा निकाल मुंबई हाय कोर्टाने दिला आहे. 28 मे चा यासंदर्भाताल अध्यादेश हायकोर्टानं रद्द केला आहे. अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

हायकोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा दणका मिळाला असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 11 वी मध्ये प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी CET परीक्षा नियोजित होती. मात्र, हायकोर्टाने सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आयसीएसई बोर्डाच्या एका विद्यार्थिनीनं सीईटी परीक्षेसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती.

सीईटी परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम हा महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित होता. त्यामुळे आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची अडचण होण्याची शक्यता होती. आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमाची माहिती नाही. त्यामुळे परीक्षेत त्यांना कमी गुण मिळण्याचा आक्षेप उपस्थित करण्यात आला होता.

अनन्या पत्की या आयसीएससीच्या विद्यार्थिनीने सीईटी परीक्षा घेण्याबाबतचा परिपत्रकाविरोधात वडील अॅड. योगेश पत्की यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. विद्यार्थिनीनं ही याचिका आपले वडील अॅड. योगेश पत्की यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती आर.डी. धानुका आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!