Share

‘पोलीस ठाण्यांमध्ये मानवाधिकारांना सर्वाधिक धोका, विशेषाधिकारधारक देखील थर्ड-डिग्री ट्रीटमेंटपासून सुटलेले नाहीत’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: देशात पोलीस ठाण्यांमध्ये मानवाधिकारांना सर्वाधिक धोका असून विशेषाधिकारधारक देखील थर्ड-डिग्री ट्रीटमेंटपासून सुटलेले नाहीत. असे विधान सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांनी एका कार्यक्रमात केले आहे. यासोबतच त्यांनी मानवी हक्कांच्या नियमावर चिंता व्यक्त केली आहे.

नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी ऑफ इंडिया ने व्हिजन आणि मिशन स्टेटमेंट साठी मोबाईल अॅप लाँच केले आहे. यासाठी सरन्यायाधीश एन.व्ही. रमण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यादरम्यान त्यांनी हे मोठे विधान केले आहे.

घटनात्मक घोषणा आणि हमी असूनही, पोलीस ठाण्यांमध्ये प्रभावी कायदेशीर प्रतिनिधीत्वाचा अभाव हे अटक किंवा ताब्यात घेतलेल्या व्यक्तींसाठी एक मोठी गैरसोय आहे यामुळे कस्टडीयल छळ आणि पोलीस अत्याचार याला बळी पडतात. त्यामुळे कायदेशीर मदत सेवांच्या उपलब्धतेबाबत प्रचार करणे आवश्यक आहे. घटनात्मक अधिकार आणि मदत याचा प्रचार होणे गरजेचे आहे. तसेच विशेषाधिकार प्राप्त आणि कमजोर लोकांमध्ये न्यायापर्यंत पोहचण्यामधील अंतर कमी करणे आवश्यक आहे.असे मत सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांनी व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!