Share

भारत विरुद्ध श्रीलंका मालिका सुरू होण्यापूर्वीचं ‘या’ खेळाडूचं निलंबन

Published On: 

🕒 1 min read

श्रीलंका : शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ सोमवारी श्रीलंकेत दाखल झाला. श्रीलंकेत टीम इंडिया तीन एकदिवसीय सामने आणि तब्बल टी -20 सामने खेळणार आहे. या दौर्‍याची सुरुवात वनडे मालिकेपासून होईल. पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै रोजी, दुसरा 16 रोजी आणि तिसरा वनडे 18 रोजी खेळला जाईल. आपला विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करून भारतीय संघ आता एकत्रित सराव करत आहेत.

दरम्यान, या साम्याच्या आधीपासून श्रीलंका क्रिकेट संघ या ना त्या कारणाने नेहमीच वादात सापडत आहे. आता भारताविरुद्ध सामने सुरु होण्याआधीच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आपला डावखुरा फलंदाज भनुका राजपक्षा याला एक वर्षासाठी निलंबित केले आहे. तसेच त्याच्यावर  3.71 लाख रुपये इतका दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

मात्र, हे निलंबन आता दोन वर्षांसाठी सस्पेंड करण्यात आल्याने भनुका त्वरीत निलंबित होणार नसून तो सध्या सरावादरम्यान संघासोबत आहे. तसेच निर्बंध लागू होण्यास काही वेळ असल्याने भारताविरुद्धच्या मालिकेत देखील खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ही कारवाई प्लेयर कॉन्ट्रेक्ट 2019-20 चे उल्लंघन केल्याप्रकरणी केली होती. भनुका राजपक्षा याने मीडियासमोर बऱ्याच मुलाखतीत श्रीलंका क्रिकेट बोर्डाविरोधात प्रश्न उपस्थित केले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!