Share

सलमानच्या ‘ राधे ‘ सिनेमाची रक्कम कोरोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी दिली जाणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाच्या सद्याच्या परिस्थिती मध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे येत आहेत. अभिनेता सलमान खान सुद्धा गरजूंची मदत करत आहे. आता पुन्हा एकदा सलमान कोरोनाग्रस्तांसाठी पुढे आला आहे. सलमानचा आगामी चित्रपट ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ ची कमाई ही कोरोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी दिली जाणार असल्याची घोषणा चित्रपटाच्या निर्मात्यांनी केली आहे. त्यामुळे या टीमचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

याविषयी निर्मात्यांनी सांगितले की, ‘सध्या देश एका वाईट परिस्थितीतून जात आहे. तर एक जबाबदार नागरिक म्हणून कोविड १९  सोबत लढण्यासाठी सगळ्यांनीच एक पाऊल पुढे आलं पाहिजे. आम्ही फक्त प्रेक्षकांच मनोरंजन करण्यावर विश्वास ठेवत नाही, तर देशात सकारात्मक बदल घडवण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहोत. आम्हाला आशा आहे की, राधे चित्रपटाच्या कमाईतून कोरोनग्रस्तांना त्यांच्या उपचारांसाठी मदत मिळू शकेल.’

या दरम्यान, सलमान खान फिल्म्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘आम्ही या महान क्षणाचे भागीदार होण्यासाठी उत्सुक आहेत ज्यातून कोरोनाशी लढण्यासाठी आम्ही थोडफार योगदान देऊ शकतो.’ सलमानचा हा आगामी चित्रपट १३ मे ला ईदच्या दिवशी ओटीटी तसेच जगभरात विविध प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!