Share

बीसीसीआयच्या मदतीसाठी मुंबई इंडियन्सचा पुढाकार ; विदेशी खेळाडूंना मायदेशी पाठवण्यासाठी करणार खास उपाय

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा रद्द केली.

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धा मध्येच स्थगित करण्याची नामुष्की ओढावली आहे. आता ही उर्वरीत स्पर्धा लवकर सुरु होणार नसल्याने आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेल्या परदेशी क्रिकेटपटूंचा आपापल्या देशांत परतण्याचा प्रवास सुरू झाला.

या निर्णयाला दोन दिवस उलटूनही विदेशी खेळाडू भारतामध्येच आहेत. बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझी त्यांना घरी पाठवण्यासाठी प्रयत्न करत आहे. बीसीसीआयची ही डोकेदुखी कमी करण्यासाठी मुंबई इंडियन्सनं पुढाकार घेतला आहे. विदेशी खेळाडूंना घरी पाठवण्यासाठी मुंबई इंडियन्स चार्टर्ड विमानाची व्यवस्था करणार आहे. या विमानातून मुंबईसह सर्वच आयपीएल टीमच्या विदेशी खेळाडूंना मायदेशी जाता येईल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!