Share

‘उद्या माझ्या जीवाचे बरेवाईट झाल्यास पूजाच्या न्यायासाठी आवाज उठवा’

Published On: 

बीड : पूजा चव्हाण आत्महत्येनंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र, त्यानंतरही हे पेल्यातील वादळ शमण्याचे नाव घेत नाहीये. या प्रकरणात रोज नवीन काहीतरी घडत आहे. पूजाच्या आईवडिलांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्र्यांना संशयावरून संजय राठोड यांचा बळी देऊ नका असे सांगितले होते. यावरूनच पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी दुसऱ्याच दिवशी पूजाच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले. पूजाच्या आईवडिलांना संजय राठोड यांनी ५ कोटी रुपये दिल्याचा दावा शांताबाई यांनी केला होताय

त्यामुळे संतप्त होऊन पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी परळी पोलीस ठाण्यात शांताबाई राठोड यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. शांताबाई राठोड यांनी आमच्या कुटुंबीयांवर केलेले आरोप निराधार असून आमची बदनामी करणारे आहेत. त्यामुळे शांताबाई राठोड यांच्याविरोधात गुन्हा नोंदवावा अशी तक्रार लहू चव्हाण यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी पूजा आणि आमच्याबद्दल अफवा पसरवून बदनामी करत आहेत. शांताबाई राठोड यांचा आमच्याशी किंवा पुजाशी काहीही संबंध नसताना त्या या प्रकरणात मौन बाळगण्यासाठी तिच्या आईवडिलांनी पाच कोटी रुपये घेतले असे वक्तव्य करत आहेत. त्यांचे सर्व आरोप खोटे असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा असे म्हटले आहे. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणाला नवे वळण लागले आहे.

पूजा चव्हाणच्या कुटुंबाकडून माझी हत्या होण्याची शक्यता आहे, असा गंभीर आरोप पूजाची चुलत आजी शांताताई राठोड यांनी केला आहे. तसंच ‘उद्या माझ्या जीवाचे बरेवाईट झाल्यास पूजाच्या न्यायासाठी आवाज उठवावा’, असं आवाहन शांताताईंनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना केलं आहे.

त्यानंतर आता पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शांताताई राठोड आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शांताताई राठोड बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना आता पूजा चव्हाणच्या कुटुंबावरच गंभीर आरोप केला आहे.

‘माझ्यावर तक्रार दाखल झाली हे चुकीचे आहे. मी सत्यासाठी लढा देत आहे. मी पुण्यात जाऊन तक्रार दिली म्हणून झळ लागली. स्वतःच्या लेकरासाठी न्याय मागण्यासाठी गेला नाहीत, अशी टीका शांताताई राठोड यांनी केली. तसंच, ‘तुम्ही माझे रक्ताचे नातेवाईक आहात, असं देखील त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ‘माझी हत्या होणार आहे. पूजा प्रकरणातील जे आरोपी आहे तेच माझी हत्या करणार आहे. मुख्यमंत्र्यांपर्यंत मला जाऊ देणार नाही, मला धमक्या येत आहे. संजय राठोड, अरुण राठोड आणि विलास चव्हाणसह त्यांच्या नातेवाईकांपासून मला धोका आहे’, असा दावा शांताबाई राठोड यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!