Share

दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणारा गजाआड

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणा-यास नाकाबंदी करणा-या पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई १ मार्च रोजी पावणे नऊ वाजेच्या सुमारास चेलीपुरा चौकात करण्यात आली.

शब्बीर शहा बाबू शहा (वय ५२, रा.कासंबदी दर्गाहजवळ, पडेगाव) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मॅकेनिकचे नाव आहे. चेलीपुरा चौकात सिटीचौक पोलिस ठाण्याचे कर्मचारी नाकाबंदी मोहिम राबवत होते. त्यावेळी दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एई-८५४६) वर जाणा-या शब्बीर शहा याला पोलिसांनी थांबवले.

पोलिसांनी वाहनाविषयी चौकशी केली असता शब्बीर शहा उडवा-उडवीची उत्तरे देत होता. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने दुचाकीवर बनावट क्रमांक टाकला असल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी शब्बीर शहा बाबू शहा याच्याविरूध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!