Share

खुशखबर : शासकीय वसतिगृह व निवासी शाळा विद्यार्थ्यांसाठी होणार खुल्या

Published On: 

🕒 1 min read

गडचिरोली : देशात  कोविड -19 ची महाभयकंर परिस्थिती उद्भ्वाल्यामुळे सर्व देशभर शासनाद्वारे लॉकडाऊन केल्या गेले होते . त्यामुळे गेल्या 10 महिन्यापासून समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणारे शासकीय वसतिगृहे व निवासी शाळा बंद करण्यात आलेल्या होत्या. कोविड-19 ची परीस्थिती नियंत्रणात येताच शासनाने यासाठी नागपूर विभागाचे डॉ. सिध्दार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण नागपूर यांनी शासकीय वसतिगृहे व निवासी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

कोविड परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी बरेचसे शासकीय व निवासी शाळा हया कोविड केअर सेंटर म्हणून देण्यात आलेले होते. सद्यस्थितीत शासनाने सर्व शाळा, महाविद्यालये सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. समाज कल्याण विभागाचे वसतिगृहे हे ग्रामिण व शहरी भागातील गरीब व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेले आहे.

विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी नागपूर विभागातील सर्व निवासी शाळा वसतिगृहे सुरु करण्यात येत आहे. वसतिगृहे सुरु करण्याआधी सर्व वसतिगृहांची स्वच्छतेच्या बाबीवर विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. त्यासाठी थर्मल स्कॅनर, ऑक्सीमीटर, सॅनिटायझर इ. व्यवस्था करण्यात आलेली आहे. तेव्हा पालकांनी आपल्या पाल्यांना वसतिगृहात पाठवावे तसेच ज्यांना सर्वातगृहात प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांनी नव्याने अर्ज करावे असे जाहीर आवाहन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूरचे  डॉ. सिध्दार्थ गायकवाड  यांनी कळविले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!