🕒 1 min read
औरंगाबाद : शहरात सध्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर करण्यासाठी भाजप आक्रमक झाला आहे, औरंगाबादसाठी काँग्रेस आग्रही आहे. परंतु मनपाकडून लावण्यात आलेल्या ‘लव औरंगाबाद’ तसेच ‘सुपर संभाजीनगर’ पोस्टरवर राजकीय मंडळींनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादचे नाव बदलण्यावरून शिवसेनेवर केलेली टीका शिवसेना नेत्यांना चांगलीच झोंबली आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, संभाजीनगर हे महाविकास आघाडीच्या अजेंड्यावरच आहे. दुसरीकडे, शहराचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी बाळासाहेब थोरात यांनाही संभाजीनगर व्हावे वाटते, परंतु मतांसाठी ते देखावा करत असल्याचे ते म्हणाले.
‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ऐकावे लागेल. संभाजीनगर हा अजेंडा ठरला आहे. यावर अजित पवारदेखील चर्चा करण्यासाठी तयार आहे. महाविकास आघाडीमधील सर्व पक्षांची मते वेगवेगळी आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर हे नाव दिलेले आहे. थोरात यांना औरंगजेब आवडीचा आहे काय? ते असे का वागतात ते समजत नाही. शिवाय ते छत्रपती संभाजी महाराजांना विरोध का करतात, हेही कळत नाही. औरंगजेबाला कोणताही मुस्लिम पसंत करत नाही, मग थोरात नामांतराला का विरोध करत आहे, हेच कळत नाहीये.
काही महिन्यांपूर्वी मनपाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातून शहरात ‘लव औरंगाबाद’ फलकाचे अनावरण पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले होते. तेव्हा नामांतराचा मुद्दा फारसा चर्चेतही नव्हता. परंतु टीव्ही सेंटर भागात ‘सुपर संभाजीनगर’ हा फलक लागताच एमआयएम तसेच काँग्रेसने हा विषय उचलून धरला. विशेष म्हणजे, शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपने आक्रमकपणे नामांतराचा मुद्दा हाती घेतला आहे. यामुळेच शहराच्या राजकारणात कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतोय.
महत्वाच्या बातम्या
- औरंगजेब दुष्ट होता, मुस्लिमांनाही त्याच्याविषयी राग-चंद्रकांत खैरे
- धनंजय मुंडे व्हिडिओ कॉलवरही शरीर संबंधाची मागणी करायचे; ‘त्या’ महिलेचा गंभीर आरोप
- उस्मानाबादच्या १६८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला लवकरच मंजुरी
- आंदोलनाची पुढील रणनीतीसाठी ‘संयुक्त किसान मोर्चा’ची तातडीची बैठक
- कृषी कायद्यांविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
