Share

भाजपात प्रवेश करताच चंद्रकांत पाटलांनी बाळासाहेब सानप यांच्यावर सोपविली मोठी जबाबदारी!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- नाशिकमधील नेते आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांची काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये घरवापसी झाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेचं शिवबंधन सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांच्या खांद्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. सानप यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी सानप यांना नियुक्ती पत्र दिलं आहे.

सानप यांच्या भाजप प्रवेशाने आगामी नाशिक महापालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला फायदा होणार आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने आपली प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करताना मला खूप आनंद होत आहे. आपण आपल्या संघटन कौशल्याने राज्यभरात पक्ष संघटन वाढविण्यासाठी अथक परिश्रम कराल, ही अपेक्षा आहे. आपल्या आगामी कार्यास माझ्या शुभेच्छा, असं चंद्रकांत पाटील सानप यांना पाठवलेल्या नियुक्ती पत्रात म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!