Share

Sushma Andhare | महाराष्ट्रात पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण असणार? सुषमा अंधारे म्हणाल्या…

Published On: 

🕒 1 min read

Sushma Andhare | नागपूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता महाराष्ट्रात एका महिलेला मुख्यमंत्री करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना कोणत्या महिलेला राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर पाहायचे आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आपण एकत्र येण्याची गरज आहे. आता राज्यात आमची सत्ता आल्यावर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर एका महिलेला बसलेले पाहायचे आहे. दरम्यान महाराष्ट्रात पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण असणार?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केले आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, “महाराष्ट्रात खुप चांगले नावं आहेत. ज्यामध्ये सुप्रिया सुळे यांचे नाव आहे. पंकजा मुंडे यांचे नाव देखील महत्वाचे आहे. शिवसेनेत देखील अने महिला आहेत. मात्र माझ्या नावाची चर्चा योग्य नाही. या सर्वांची शिपाई म्हणून मला काम करायला आवडेल.”

अजित पवार यांची प्रतिक्रिया-

“कुणाला काय वाटतं, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे यांच्या मनात तसे आले असेल म्हणून त्यांनी तशे स्टेटमेंट केले असेल. उद्या कुणालाही मुख्यमंत्री करायचे म्हटले, म्हणजे पुरूषाला करा, स्त्रीला करा आणखी कुणाला करा. मात्र १४५ जे बहुमत जो मिळवू शकतो तो मुख्यमंत्री होऊ शकतो. त्यामुळे १४५ चा आकडा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभा राहीला तर ते म्हणतील तसे होऊ शकते,” असे अजित पवार म्हणाले.

महाराष्ट्रात आतापर्यंत १९ मुख्यमंत्री झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी 20 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असली तरी आतापर्यंत एकाही महिला नेत्याला या पदावर संधी मिळालेली नाही. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य महत्त्वाचे ठरते. महिला नेत्याला पुढचा मुख्यमंत्री करण्याचे वक्तव्य करून त्यांनी राज्यातील महिला व्होटबँक खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत महिला नेत्याला मुख्यमंत्री करण्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरेंना घरातील महिलेला मुख्यमंत्री करायचे आहे. त्यामुळे त्यांनी असे वक्तव्य केले आहे. नवनीत राणा म्हणाल्या की, एखादी महिला राज्याची मुख्यमंत्री झाल्यास मला खूप आनंद होईल. मात्र उद्धव ठाकरेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!