Share

Ajit Pawar | “राज ठाकरेंचा आरोप हास्यास्पद”; ‘त्या’ प्रकरणावर अजित पवारांचं सडेतोड प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

Ajit Pawar | पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघात केला. शिवाजी महाराजांवर वारंवार वक्तव्य केले जातात, यावर राज ठाकरे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यावरून राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जातीय राजकारण करण्याचा आरोप केला. शरद पवार स्वत:हून कधीही शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे नाहीत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. यावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

ते म्हणाले, “शरद पवारांना महाराष्ट्र ५५ वर्ष ओळखतोय. ५५ वर्ष शरद पवार राजकारण करत आहेत. त्यांनी नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार डोळ्यांसमोर ठेवला आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचं काम केलंय.” वास्तविक राज ठाकरेंनी हा आरोप करणं म्हणजे हास्यास्पद बाब आहे. त्यात नखभरही तथ्य नाही, असं म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं.

“राज ठाकरेंचा आरोप धादांत बिनबुडाचा आहे. शरद पवारांचं नाव घेतलं तर ती बातमी होते. राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे योग्य वाटत नाही. हेच राज ठाकरे शरद पवारांची मुलाखत घेत होते, तेव्हा त्यांच्याबद्दल काय बोलत होते? इतकं दुटप्पीही माणसाने वागू नये”, असं घणाघात अजित पवार यांनी केलाय.

नेमकं काय म्हणाले होते राज ठाकरे?

“जे शरद पवार साहेब स्वत:हून कधीही शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे नाहीत. त्यांची भाषणे काढून बघा, व्यासपिठावर फक्त शाहू, फुले, आंबेडकर. मी त्यांची मुलाखत घेतली तेव्हापण विचारले होते. त्यात ते म्हणाले होते शाहू, फुले, आंबेडकर हा एक विचार आहे. मग शिवाजी महाराज काय विचार नव्हता का? त्या विचारावर आधारित पुढचे विचार आहेत. मुळ विचार शिवरायांचा आहे,” असे राज ठाकरे म्हणाले. “शिवरायांचे नाव घेतले की मुस्लिम मते जातात. मग कुठल्यातरी टोळ्या फंडींग द्यायला उभ्या करायच्या. त्यांच्याकडून शिवाजी महाराजांचे राजकारण करुन घ्यायचे. इतर समाज आणि मराठा समाज यात जशी-जशी फूट पाडता येईल, तसा प्रयत्न करायचा. राष्ट्रवादीच्या जन्मापासून हे सुरु झालं. महाराष्ट्रात १९९९ पासून हे विष कालवल्या गेलं,” असा आरोप राज ठाकरेंनी केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!