🕒 1 min read
Prakash Mahajan | पुणे : अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापलेलं आहे. यामध्ये भर टाकत मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना महाजन यांनी सुषमा अंधारे यांचा एकेरी उल्लेखही केला आहे.
सुषमा अंधारे यांनी कालच्या मुलुंड येथील सभेतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. यावर प्रकाश महाजन यांनी भाष्य केलं. “या बाईला काय बोलावं? मी बीड जिल्ह्यातील आहे. तीही बीड जिल्ह्यातील आहे. तिला बोलायला ठेवलंय, भुंकायला नाही. मेंदूला नारू झाला की काय तिच्या?”, असा सवाल प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी केला.
पुढे ते म्हणाले, “इतके वर्ष महापालिकेत सत्ता असून मातोश्रीचा मजला चढला नाही. पण कृष्णकुंजचा मजला चढला, असं ती म्हणाली.” हे बोलण्याआधी तिने आपल्या मालकाला विचारायला हवं ना. मी असं बोलू की नको हे विचारलं पाहिजे ना?, असा सवालही महाजन यांनी यावेळी बोलताना केला.
राज ठाकरे यांना पुत्रमोह आडवा येतोय, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली होती. यावर “सुषमा अंधारेना पुत्रमोह होऊ शकत नाही, कारण त्यांची वेगळी अडचण आहे”, असं महाजन म्हणाले. दरम्यान महाजन यांच्या वक्तव्याला सुषमा अंधारे काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | “राज ठाकरेंचा आरोप हास्यास्पद”; ‘त्या’ प्रकरणावर अजित पवारांचं सडेतोड प्रत्युत्तर
- Ajit Pawar | बहुमताचा आकडा ज्याच्याकडे त्याचा मुख्यमंत्री ; अजित पवार स्पष्ट बोलले
- Salman Khan | एक्स-गर्लफ्रेंड सोमी अलीने सलमान खानवर केला विनयभंगाचा आरोप
- Gulabrao Patil | “पाच कोटी मोजायला गेले होते का?”; चंद्रकांत खैरेंच्या ‘त्या’ आरोपावर गुलाबराव पाटलांचा पलटवार
- ENG vs WI | इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी वेस्टइंडीज महिला क्रिकेट टीम जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
