🕒 1 min read
Aaditya Thackeray | मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना बुधवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. 1 ऑगस्ट रोजी ईडीने अटक केलेल्या संजय राऊतला तीन महिन्यांनी जामीन मिळाला. संजय राऊत यांना 2 लाखांच्या जामिनावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन जाहीर करताच त्यांच्या समर्थकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 21 ऑक्टोबर रोजी जामीन अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले, “न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. हुकूमशाहीच्या दिशेने आपण चाललो आहोत का हे पाहणे महत्वाचे आहे. जो कोणी सरकार विरोधात बोलत आहे. त्याला धमक्या दिल्या जात आहेत. आता तोफ पुन्हा रणांगणात आली आहे. संजय राऊत यांचे कौतुक करणे गरजेचे आहे. संजय राऊत हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ते खरे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. उगाच नाव लावून फिरत नाहीत. दबावतंत्र वापरलं तरी देखील ते पळून गेले नाही. त्यांनी गद्दारी केली नाही. ते डरपोक नाहीत हे लोकांसमोर आलं आहे. जे डरपोक होते ते पळून गेले.”
काय आहे प्रकरण-
पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरा ईडीनं अटक केली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली होती. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करुन सर्व व्यवहार करत होते असं ईडीने म्हटलं आहे. या संदर्भात कोर्ट आज काय निर्णय देणार याकडे सर्वांच लक्ष होतं. अशातच संजय राऊतांना जामीन मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare | संजय राऊतांचा जामीन मंजूर झाल्यानंतर सुषमा अंधारे ढसाढसा रडल्या
- Deepali Sayyed | “रश्मी ठाकरेंना ‘खोके’ येणं बंद झाल्याची खंत” ; दिपाली सय्यद यांचा घणाघात
- Kishori Pednekar | “खोके मिळाल्याचा पुरावा आमच्याकडे आहे”, किशोरी पेडणेकरांचा मोठा गौप्यस्फोट
- Sanjay Raut | ” राऊतांच्या जामिनाला स्थगिती द्या, मोठी नावं गुतली आहेत”; ईडीची कोर्टात मागणी
- Bharat Jodo Yatra | महाविकास आघाडीचे ‘हे’ बडे नेते होणार भारत जोडो यात्रेत सहभागी, कोण अन् कधी जाणून घ्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
