Share

Sushma Andhare | संजय राऊतांचा जामीन मंजूर झाल्यानंतर सुषमा अंधारे ढसाढसा रडल्या

Published On: 

🕒 1 min read

Sushma Andhare | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान संजय राऊतांचा जामीन अर्ज अखेर मंजूर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) ढसाढसा रडल्या.

आपली प्रतिक्रिया देताना, संजय राऊत यांच्यामुळे आम्हाला दहा हत्तींचं बळ मिळतं, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. याबाबत टाईगर इज बॅक असं फेसबुक पोस्ट देखील अंधारेंनी केलं आहे. यापुढे बोलताना सुषमा अंधारे यांना गहिवरुन आलं होतं. त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले होते.

पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरा ईडीनं अटक केली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला.

राऊत यांचे भाऊ प्रवीण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!