Share

Deepali Sayyed | “रश्मी ठाकरेंना ‘खोके’ येणं बंद झाल्याची खंत” ; दिपाली सय्यद यांचा घणाघात

Published On: 

Deepali Sayyed | मुंबई : दीपाली सय्यद यांनी मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणणार असून त्यांची बैठक आयोजित करणार असल्याची घोषणा दीपाली सय्यद यांनी केली होती. मात्र आता त्यांनीच एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

वर्षा बंगल्याबाहेर माध्यमांशी संवाद साधताना दीपाली सय्यद यांनी शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Nilam Gorhe), सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंवर (Rashmi Thackeray) टीका केली. मुंबई महानगरपालिकेचे (BMC) खोके वेळेवर मातोश्रीवर पोहचत नसल्याची खंत रश्मी वहिंनीना असल्याचे आरोप त्यांनी केलेत.

त्या म्हणाल्या, नीलम गोऱ्हे, सुषमा अंधारे हे चिल्लर आहेत. खोक्यामागील  सूत्रधार रश्मी ठाकरे असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबई महानगरपालिकेमधून येणारे खोके वेळेवर मातोश्रीवर पोहचत नाहीत. याची खंत रश्मी वहिनींना जाणवत असल्याचे दीपाली सय्यद यांनी म्हटले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्याला शिवसेनेत आणलं होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर उभे राहणं कर्तव्य आहे, असे दीपाली सय्यद (Deepali Sayyed) यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, “संजय राऊत हे पक्षफुटीसाठी जबाबदार आहेत. संजय राऊत यांना त्यांच्या पापाची शिक्षा झाली आहे. पक्ष तोंडाने कसा फोडला जातो, याचं उत्तम उदाहरण संजय राऊत आहेत.” संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले असल्याचंही दीपाली सय्यद (Deepali Sayyed) यावेळी बोलताना म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!