🕒 1 min read
Gujrat Incident | गांधीनगर : गुजरात (Gujrat) येथील राजकोटमधील मोरबी (Morbi) भागात पूल कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली . या बातमी संपुर्ण शहर हादरलं आहे. मृत्यू झालेल्यांचा एकीकडे वाढतोय तेच आणखीन एक बातमी समोर येत आहे. या दुर्घटनेत केवळ सर्वसामान्यचं नाही तर भाजप (BJP) पक्षातील खासदाराच्या १२ नातेवाईकांचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश होता.
राजकोटचे भाजपा खासदार मोहनभाई कल्याणजी कुंदारिया यांच्याही परिवारातील १२ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती खुद्द कुंदारिया यांनी दिली आहे. कुंडारिया यांच्या बहिणीच्या दिराच्या चार मुली आणि तीन जावई यांच्यासह पाच मुलांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच कुंडारिया रविवारपासून मोरबीयेथेच तळ ठोकून बसले आहेत.
नातेवाईक गमवलेल्या संतप्त भाजप खासदार या दुर्घटनेस जे कारणीभूत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करणारच. दोषींना कठोर शिक्षा करणार, असं कुंडारिया यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, हा पूल सुमारे 7 महिन्यांपासून बंद होता. केबल ब्रिज बराच जुना असून नूतनीकरणानंतर केवळ 5 दिवसांपूर्वीच तो कार्यान्वित झाल्याचे सांगण्यात येत आहे. नूतनीकरणानंतरही एवढा मोठा अपघात घडल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पुलावर उभे असलेले शेकडो लोक मच्छू नदीत पडले. मिळालेल्या माहितीनुसार, मोरबी दुर्घटनेत आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, रविवारी संध्याकाळी झालेल्या या दुर्घटनेत १३१हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असून बचावकार्यासाठी पथके दाखल झाली आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंच्या मिटिंगमधले ‘ते’ व्हिडीओ दाखवू का?, शिंदे गटातील नेत्याचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
- Eknath Shinde | “उद्धवचा वाटा महाराष्ट्राचा तोटा” ; शिंदे गटाकडून पुण्यात जोरदार बॅनरबाजी
- NCP | महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या प्रकल्पांवर बोलताना राष्ट्रवादीच्या आमदाराने केलं ‘हे’ मोठे विधान
- Uddhav Thackeray | “मोदी आयोध्यातील श्रीरामाचे पूजन करतात अन् अनुयायी भलत्याच रामाच्या…”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा
- Sujay Vikhe Patil | महाराष्ट्राबाहेर जात असलेल्या प्रकल्पावर सुजय विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
