Share

NCP | महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या प्रकल्पांवर बोलताना राष्ट्रवादीच्या आमदाराने केलं ‘हे’ मोठे विधान

Published On: 

NCP | मुंबई : वेदांता पाठोमाठ नागपूरमध्ये (Nagpur) होणारा  C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’(Tata Airbus Prroject) महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. त्यामुळे  आतार्यंत चार मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. असे असताच नागपूरच्या मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्पही हैदराबादला गेल्याचे म्हटले जात आहे. यामुळे राज्यात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार अनिल पाटील (Anil Patil) यांनी मोठं विधान केलं आहे.

काय म्हणाले राष्ट्रवादी पक्षाचे (NCP) आमदार अनिल पाटील

अनिल पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील जनतेला अजित पवार यांच्यासारखे मुख्यमंत्री असावेत असे वाटत आहे. अनिल पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चांना सुरूवात झाली आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, असे मत राज्यातील आमदार, खासदारांचे असेल तर ते स्वाभाविक आहे. अजित पवार यांनी मागील अडीच वर्षांत चांगले काम केले. तीन पक्षाच्या सरकारला सोबत घेऊन त्यांनी उत्कृष्ट राज्यकारभार चालवला. त्यामुळे नेत्यांसह राज्यातील जनतेलाही आपल्या राज्याचा मुख्यमंत्री हा इतर राज्यांचे नेतृत्व करणारा नकोय, असे वाटत आहे. येथील जनतेला अजित पवार यांच्यासारखा मुख्यमंत्री असायला पाहिजे, असे वाटत आहे. राज्यातील उद्योग परराज्यात जात असल्याचा मुद्द्यावर बोलताना राज्यातील उद्योग परराज्यात जाणार नाहीत तसेच रिकामे उद्योग करणार नाही, असा मुख्यमंत्री राज्याला हवा असल्याचं अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रकल्प राज्याबाहेर जाण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही यावर वक्तव्य केलं आहे. तूतू-मैंमैं करण्यापेक्षा राज्यात जास्तीत जास्त प्रकल्प कसे येतील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अशा वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी,असं त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!