Share

Bhaskar Jadhav | भास्कर जाधव यांच्या घरावर आज्ञात इसमानांनी केली दगडफेक

Published On: 

🕒 1 min read

Bhaskar Jadhav | मुंबई : सत्तांतर नंतर विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर अतिशय कठोर शब्दात टीका करत आहेत. अलिकडेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर हल्लाबोल केला होता. यावरुन भाजप कार्यकर्त्यांमध्ये संताप पाहायला मिळत असून त्यांच्या विरोधात तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. अशातच भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

चिपळूण येथील भास्कर जाधव यांच्यावर आज्ञातांनी मध्यरात्री भास्कर जाधव यांच्या घरावर दगड फेक करण्यात आली. यावेळी स्टंम्प आणि बाटल्या फेकून आज्ञात पसार झाले आहेत. जाधव यांच्या घर आणि वाहनांवर दगड फेकण्यात आले आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ही दगडफेक कुणी केली हे अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जाधव यांच्या घरी धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी त्यांच्या घराभोवती बंदोबस्त वाढवला आहे. तसेच घराशेजारील सीसीटीव्ही कॅमरे तपासले जात आहेत. तसेच शेजाऱ्यांचीही चौकशी करून काही माहिती मिळते का याचा पोलीस शोध घेत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र दौरा करत असलेले भास्कर जाधव त्यांच्या दौऱ्या शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवत आहेत. तसेच, दगडफेक झाल्यानंतर त्यांनी अद्याप कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!