🕒 1 min read
मुंबई : मागिल दोन वर्ष आपण महाभयंकर कोरोना (Corona) सारख्या संसर्गजन्य रोगामुळे त्रस्त झालो होतो. यावर्षी कुठेतरी परिस्थिती सुधारली आहे. त्यामुळे आताकुठे सर्व सण, उत्सव आधी सारखे साजरे केले जात आहे. वर्षातला सर्वात मोठा सण दिवाळी काही दिवसातच येणार आहे. परंतू अशातच राज्य सरकारने (State Government) कोरोना संसर्ग रोग वाढत असल्याचा सूचक इशारा (Warning) दिला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने कोरोनासंदर्भातील मार्गर्शक तत्वे (Guiding Principles) जारी केली आहेत.
कोरोना (Corona) संसर्ग रोग वाढण्याचा इशारा
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत या आठवड्यात मागील आठवड्याच्या तुलनेत 17.7 टक्क्यांनी वाढ झाली असल्यामुळे आरोग्य विभागाकडून (Health Department) हा इशारा देण्यात आला आहे. राज्याने ओमायक्रॉनच्या एक्सबीबी प्रकारचा अहवाल दिला आहे. जो BA.2.75 पेक्षा घातक आणि रोगप्रतिकारक क्षमता कमी करणारा नवीन प्रकार आहे. एक्सबीबी हा ओमायक्रॉनच्या BA.2.75 आणि BJ.1 या सबव्हेरिएंटचा हायब्रिड प्रकार आहे. जो ऑगस्टमध्ये सिंगापूरमध्ये शोधला गेला. या प्रकारामुळे तिथे कोरोना रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे, ही सर्व माहिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. प्रदीप आवटी (Pradeep Awatee) यांनी सांगितली.
तसेच, आवटी यांनी हेही सांगितले की BA.2.3.20 आणि BQ.1 सह इतर कोविड-19 च्या विषाणूंची प्रकारणही महाराष्ट्रात दिसून येत आहेत. जे देशभरात अन्य ठिकाणी आढळलेले आहेत.
राज्य सरकारची मार्गदर्शक तत्वे-
1. तापासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
2. लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घ्या.
3. सार्वजनिक ठिकाणी करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून वावरा
4. भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लसीकरण.
5. अगोदरच आजारी असलेल्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना अधिक खबरदारी घेणे
6. इन्फ्लूएंझा सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी शक्यतो सार्वजनिक संपर्क टाळावा.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena । अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतल्याने शिवसेनेने सामन्यातून मानले आभार
- BJP | “कही पे निगाहे कही पे निशाणा…”, रोहित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याला भाजपचं प्रत्युत्तर
- Kishori Pednekar | पुण्याच्या पावसावरून फडणवीसांना पेडणेकरांचा खोचक सवाल, “तेव्हा ‘हा’ समंजसपणा कुठे जातो?”
- Sushma Andhare । उद्धव ठाकरेंसोबत शिंदे गटातील अनेक आमदार परत येणार? सुषमा अंधारेंचा दावा
- Bhaskar Jadhav | राणेंवर खालच्या दर्जाच्या शब्दांमध्ये केलेली टीका भोवणार?, भास्कर जाधवांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
