🕒 1 min read
BJP | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदारांसोबत बंड करुन भाजप (BJP) सोबत युती केली. यावरुन राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे रोहित पवार यांनी भाजप (BJP) पक्षावर धक्कदायक आरोप केला होता. याच आरोपाला भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर –
रोहित पवारांना निश्चितपणे काय बोलायचं आहे हे त्यांनी त्यांच्या घरातच पाहिलं पाहिजे, भारतीय जनता पार्टीची संस्कृती नाही, भारतीय जनता पार्टी कधी अशा प्रकारचे उद्योग केलेले नाही, करोडो कार्यकर्त्यांची पार्टी असलेली भारतीय जनता पार्टी ही आपला पक्ष सांभाळते, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.
यादरम्यान, मला वाटतं की रोहित पवारांचं काही पे निगाहे कही पे निशाणा अशा प्रकारचं वक्तव्य आहे, मला वाटतं की पहिलं त्यांना कोणाबद्दल बोलायचं, त्यांच्या घरातल्या कुठल्या व्यक्तीबद्दल बोलायचंय, हे त्यांनी ठरवायला पाहिजे आणि आपण किती वय आहे आणि आपण किती बोलतो आहोत याबद्दल देखील रोहित पवारांनी स्वतः विचार केला पाहिजे आणि कदाचित आजोबांकडून थोडीशी ट्युशन देखील घेतली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे, असा खोचक टोला प्रसाद लाड यांनी यावेळी रोहित पवारांना लगावला आहे.
भाजप (BJP) बाबत काय म्हणाले होते रोहित पवार –
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा भाजपचा डाव आहे, असा खळबळजनक आरोप रोहित पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी फोडण्याचं भाजपचं टार्गेट आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं. सोमवारी भाजपच्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णयावर देखील टीका केली होती. हा निर्णय आधीच घेतला असता तर महाराष्ट्राची पंरपरा जपली गेली असती असं देखील ते म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare । उद्धव ठाकरेंसोबत शिंदे गटातील अनेक आमदार परत येणार? सुषमा अंधारेंचा दावा
- Bhaskar Jadhav | राणेंवर खालच्या दर्जाच्या शब्दांमध्ये केलेली टीका भोवणार?, भास्कर जाधवांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार
- Nitesh Rane । “भास्कर जाधव खरंच शिक्षकाचे पुत्र आहेत का, हा संशोधनाचा विषय”; नितेश राणेंचा पलटवार
- Kishori Pednekar । “कुणाच्या कळा, कुणाचं बाळंतपण…”; किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंवर घणाघात
- Bhaskar Jadhav । “मग तू काय म्हशी भादरत होतास?”; भास्कर जाधवांचा राणेंवर घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
