🕒 1 min read
मुंबई : बारामती येथे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षरीत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. अनेक वेळा कामातून वेळ काढून नरेंद्र मोदी त्यांच्या आईला भेटायला जातात. यावेळी त्यांचा आणि त्यांच्या आईचा फोटो देखील व्हायरल होत राहतात. यावरूनच अजित पवारांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टोला लगावला आहे.
नरेंद्र मोदी यांच्यावर अजित पवार यांचा टोलाः
मी पण बारामती मध्ये येतो आईला भेटतो, मी कधी फोटो काढला नाही, असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. आताही सभा संपल्यानंतर आईला भेटायला जाणार असून फोटो काढणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
यादरम्यान, बोलताना आपल्याला ज्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत ते योग्य पद्धतीने पार पाडा, असा सल्लाही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. तुम्ही मला मुंबईत पाठवलं मग मी काय रडत बसलो का?, नाही, तर मी मुंबईत राहून माझी जबाबदारी पार पाडत आहे, आपल्यावर आपली वरिष्ठ सहकारी आणि इतर कोणीही जबाबदारी सोपवतील ती पूर्ण करावीच लागते, असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- MNS । ‘त्या’ रिकाम्या खुर्चीवर ते राऊतांच्या चपलाही ठेवतील; मनसे नेत्याकडून शिवसेनेचा समाचार
- Oppo Smartphone Update | लवकरच Oppo लाँच करू शकतो Find X6 Series चे 2 नवीन स्मार्टफोन
- Ambadas Danve | “कोरोना काळात तुम्ही रात्री काय कारायचा…” अंबादास दानवेंचं संदीपान भुमरेंना प्रत्युत्तर
- Nirmala Sitaraman | “वेदांता वरुन रान उठवताय, तुमच्या काळात…”, निर्मला सीतारमन कडाडल्या
- Health Tips | जर तुमचा घसा खवखवत असेल तर, उपाय म्हणून वापरा स्वयंपाक घरातील ‘हे’ मसाले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
