मुंबई : औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर अनेक आरोप केले होते. यालाच आता उत्तर देत राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पलटवार केला आहे.
अंबादास दानवे यांचं उत्तरः
कोरोना काळात तुम्हीही काय केलं हे तपासलं पाहिजे, तुम्ही दिवसा काय करत होता आणि रात्री काय करत होता हे काढायला लावू नका, असा इशारा अंबादास दानवे यांनी संदीपान भुमरेंना दिला आहे. एवढंच नाही तर यावेळी भुमरे यांनी नमक हरामी आणि हरामखोरीची भाषा करू नये असा सज्जत दमच अंबादास दानवे यांनी भरला आहे.
मास्क लावणं हाच वाचवण्याचा पर्याय होताः
कोरोनाचा संकट महाराष्ट्रातच नाही तर देशावर होतं, जगावर होतं, त्यामुळे मास्क लावणं हाच वाचवण्याचा पर्याय होता, या मास्कनेच महाराष्ट्राला वाचवलं, उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रने रस्त्यावर प्रेत फेकून दिली नाहीत, महाराष्ट्र कधी थाल्या वाजवत बसला नाही, कधी दिवे लावत बसला नाही, कोरोना काळात खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे यांनी प्रॅक्टिकल काम केलं असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.
दानवेंचा शिंदे गटाला टोलाः
दरम्यान, शिवसेना दसरा मेळावा नैसर्गिक रित्या होत असतो, या मेळाव्याला येणारे शिवसैनिक स्वतः खर्चाने येतो सोबत भाजी भाकरी घेऊन येतो बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर श्रद्धा व्यक्त करण्यासाठी येतो. मात्र, बाकीच्यांना गर्दी जमवण्यासाठी बस कराव्या लागत असून रस्त्याने येताना खाण्यापिण्याची व्यवस्था करावी लागत असल्याचा देखील टोला दानवे यांनी शिंदे गटाला यावेळी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Electric Bike | फक्त इलेक्ट्रिक कारच नाही तर ‘या’ इलेक्ट्रिक बाईक देखील आहेत शानदार
- Gulabrao Patil । दसरा मेळाव्यात गांधी, पवारांचे विचार मांडू नका; गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
- Viral Video | विमानात चढला फेरीवाला, मजेशीर पद्धतीने वस्तू विकण्याचा केला प्रयत्न
- INS | अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांच्या नावाची चर्चा वाढली; मुख्यमंत्री पदाचाही राजीनामा देणार?
- Sandipan Bhumare | “वर्षा बंगला सोडताना उद्धव ठाकरेंनी एखाद्या नवरी सारखं…”, उद्धव ठाकरे पुन्हा एकदा संदीपान भुमरेंच्या निशाण्यावर


