🕒 1 min read
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे ते भिवंडी या महामार्गावर येऊन खड्डे बघावे. तसेच या मार्गावरून प्रवास करुन दाखवावा, असे आवाहन केले आहे. काय पाऊस, काय पूर, काय खड्डे, सगळं ओक्के आहे असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. छगन भुजबळ हे लासलगाव येथे निफाड तालुक्यातील सोसायटीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री राहिले असून त्यांच्याकडे सध्या सर्वच खाती आहेत. त्यामुळे त्यांनी ठाणे ते भिवंडी या मार्गावर येऊन प्रवास करावा या ठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहेत, असे भुजबळ म्हणाले.
यावेळी सरपंच जनतेतून निवडून द्यायच्या शिंदे सरकारच्या निर्णयावर देखील छगन भुजबळ यांनी टीका केली. सरपंच जनतेतून पाहिजे मग मुख्यमंत्री फुटलेल्या आमदारातून का, असा सवाल भुजबळ यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :
- Virat Kohli : “कोहलीला ‘या’ कारणामुळे बीसीसीआय संघातून वगळण्याचे धाडसही…”; इंग्लंडच्या माजी खेळाडूचं वक्तव्य
- Eknath Khadse : “१५ दिवस झाले तरी हे सरकार अजूनही जेवणावळीतच व्यस्त”; एकनाथ खडसेंचा शिंदे सरकारवर निशाणा
- Mahesh Tapase:राज्य अतिथीगृहात कार्यक्रम घेतल्याप्रकरणी संतोष बांगर यांच्यावर कारवाई करा – महेश तपासे
- Gopichand Padalkar : जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर सत्ता गेल्याचं सुतक – गोपीचंद पडळकर
- CM Eknath Shinde : मुख्यमंत्री फडणवीसांच्या नियंत्रणात?; शिंदेंच्या कानात कुजबुज करतानाचा VIDEO व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
