🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्या घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत खेळत आहे. दिल्ली आणि कटक येथे झालेल्या सामन्यांमध्ये भारतीय संघ पाहुण्या संघाकडून पराभूत झाला आणि मालिकेत ०-२ ने पिछाडीवर आहे. दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ६ गडी बाद १४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने १८.२ षटकांत ६ गडी गमावून लक्ष्य गाठले.
आतापर्यंत ही टी-२० मालिका भारतीय संघासाठी चांगली राहिलेली नाही. २०० हून अधिक धावा केल्यानंतरही गोलंदाजांनी धावा देत सामना गमावला. त्याचवेळी दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये पकड घेतल्यानंतरही संधी गमावली आणि संघाने सामना गमावला. गोलंदाजांची कामगिरी आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे झालेली नाही, त्यामुळे संघाचा पराभव होत आहे. दुसऱ्या टी-२० दरम्यान, युझवेंद्र चहलने चौकाराचे द्विशतक पूर्ण केले.
चहल स्पर्धेत फार काही करू शकला नाही. रविवारी त्याने नकोसा विक्रम बनवला. टी-२० क्रिकेटमध्ये चौकार खाण्याच्या बाबतीत चहलने द्विशतक पूर्ण केले. त्याच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये एकूण २०१ चौकार आहेत. या यादीत भुवनेश्वर कुमार दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याच्या नावावर १९१ टी-२० चौकार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
