🕒 1 min read
मुंबई : “माणसाने कधीही कोणत्याही गोष्टीचं जास्त टेन्शन न घेता काम करत राहायला पाहिजे. जर विधानपरिषद बिनविरोध निवडणूक करण्यासाठी समोरून सकारात्मक प्रतिसाद आला तर प्रयत्न करणार आहे. आता राज्यसभा निवडणुकीत आलेला अनुभव पाहता महाविकास आघाडी योग्य तो निर्णय घेईल, अशी आम्हाला आशा आहे. माझा आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोन कायम सुरू आहे,” असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
“गेल्या काही दिवसांमध्ये तपास करणाऱ्या यंत्रणांवर दबाव आणायचं काम सुरू झालं आहे. कारवाई केली तर घेराव घालणार का तुम्ही, हे चुकीचं आहे. तीन वर्षांपूर्वी एका नेत्याला ईडीची नोटीस आली त्यावेळी हजारोच्या संख्येनं आंदोलन केलं होतं. कशाला ईडी पाहिजे मीच स्वतः ईडीकडे जातो म्हणत हजारो नागरिक गोळा केले. या सगळ्याचा ईडीवर काही परिणाम होणार नाही,” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
राहूल गांधी यांना आज ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आहे. दिल्ली पोलिसांकडून ईडीच्या कार्यालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्याला आहे. राहूल गांधी यांन चौकशीसाठी बोलावल्याने आता देशभरात अनेक ठिकाणी कॉंग्रेसकडून जोरदार आंदोलन कऱण्यात येत आहे. यामुळे चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांवरती दबाव आणला जात असल्याचं म्हटलं आहे. देशात अनेक ठिकाणी ईडी कारवाई करीत आहे. त्याला विरोध करण्याचं प्रमाण वाढलं आहे. महाराष्ट्रात देखील नागपूर आणि मुंबई कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलनाला सुरूवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
