Share

“आज जर अशी घटना घडली तर…”, चहलला १५व्या मजल्यावरून लटकवणाऱ्या खेळाडूवर शास्त्री संतापले!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री भारतीय लेग-स्पिनर युझवेंद्र चहलच्या एका खुलाशानंतर संतापले आहेत. आयपीएल २०१३ दरम्यान, एका विदेशी खेळाडूने चहलला हॉटेलच्या १५व्या मजल्याच्या बाल्कनीत लटकवले होते. या घटनेवर नाराजी व्यक्त करत शास्त्री यांनी त्या खेळाडूविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. आहे. शास्त्रींच्या म्हणण्यानुसार, ज्या खेळाडूने चहलसोबत हे केले त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात यावी आणि त्याला भविष्यात कधीही क्रिकेटच्या मैदानावर येऊ देऊ नये.

२०१३मध्ये राजस्थान रॉयल्सच्या यूट्यूब चॅनलवर आर. अश्विन आणि करुण नायरसोबतच्या एका मुलाखतीत चहलने या घटनेचा खुलासा केला आहे. चहल म्हणाला, “मी आजपर्यंत या गोष्टीबद्दल कोणालाही सांगितले नाही. २०१३ची ही गोष्ट आहे. तेव्हा मी मुंबई इंडियन्स संघात होतो आणि आम्ही सामना खेळण्यासाठी बंगळुरूला गेलो होतो. यानंतर एक पार्टी होती. त्यात एक विदेशी खेळाडू होता. मी त्या खेळाडूचे नाव घेणार नाही. पण तो दारूच्या नशेत होता. तो बराच वेळ माझ्याकडे बघत होता. त्याने मला त्याच्याकडे बोलावले. मी त्याच्याकडे गेल्यावर त्याने मला बाल्कनीत नेले आणि खाली लटकवले. त्यावेळी माझे हात त्या खेळाडूच्या गळ्यात गुंडाळलेले होते. तुम्ही अंदाज लावू शकता, जर माझी पकड सुटली असती, तर मी १५व्या मजल्यावरून खाली पडलो असतो. काही लोकांनी त्या खेळाडूला असे करताना पाहिले आणि परिस्थिती हाताळली. या घटनेनंतर मी बेशुद्ध पडलो होतो.”

चहलच्या या खुलाशानंतर रवी शास्त्री चांगलेच भडकले आहेत. “मला माहीत नाही की तो खेळाडू कोण होता? त्याला भानच नव्हते. ही चिंतेची बाब आहे. अशी घटना कोणत्याही परिस्थितीत हास्यास्पद नाही. आज जर अशी घटना घडली, तर त्या खेळाडूवर ताबडतोब बंदी घालून त्याला पुनर्वसन केंद्रात पाठवावे. कारण तो कुणाच्या तरी जिवाचा प्रश्न होता. लोकांना हा विनोद वाटू शकतो. पण माझ्यासाठी तो हसण्यासारखा नाही.” असे शास्त्री म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!