मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर काल (८ एप्रिल) एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या घटनेनंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. याच मुद्द्यावरून बोलत असतांना आता भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच काल झालेला हल्ला संजय राऊतांनीच नियोजनबद्ध केलाय का?, असा खोचक सवालही दरेकर यांनी विचारला आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना प्रविण दरेकर म्हणाले की,‘कालचा हल्ला हा संजय राऊतांनीच नियोजनबद्ध केलाय का? संजय राऊत ईडीची कारवाई झाली म्हणून विषय वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही या घटनेचं समर्थन करत नाही. आम्ही एसटी कर्मचाऱ्यांसोबत आहोत,’ असे दरेकर म्हणाले.
दरम्यान, काल घडलेल्या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी १०४ कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunratna Sadavarte) यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- “झुंडीना भिणारा नाही, शूर सह्यांद्रीचा सिंह…”, जितेंद्र आव्हाडांनी लिहिली शरद पवारांवर कविता
- IPL 2022 ठरतंय कंटाळवाणं..? सामने सुरू असताना BCCIला बसला ‘मोठा’ धक्का!
- “राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी ही घटना”- रुपाली चाकणकर
- “एसटी कामगार आंदोलन भरकटलं गेलं”; गोपीचंद पडळकर
- IPL 2022 : चालू सामन्यात फलंदाजानं घेतला टॉयलेट ‘ब्रेक’ अन्….! गुजरात-पंजाब मॅचमध्ये घडला ‘असा’ प्रकार; पाहा VIDEO
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

