मुंबई : आयपीएल २०२२च्या १७व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद डीवाय पाटील स्टेडियमवर आमनेसामने आले आहेत. या सामन्यात हैदराबादचा कप्तान केन विल्यमसनने टॉस जिंकत चेन्नईला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. गोलंदाजांना पोषक असणाऱ्या या खेळपट्टीवर चेन्नईने हैदराबादला १५५ धावांचे आव्हान दिले आहे.
चेन्नईचा डाव
रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड यांनी चेन्नईसाठी सलामी दिली. दबावात खेळणाऱ्या उथप्पाला (१५) वॉशिंग्टन सुंदरने जाळ्यात अडकवले. तर ऋतुराजला (१६) टी. नटराजनने तंबूत धा़डले. पॉवरप्लेमध्ये संकटात सापडलेल्या चेन्नईला अंबाती रायुडू आणि मोईन अली यांनी बाहेर काढले. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचली. सुंदरने रायुडूला बाद करत ही भागीदारी मोडली. रायुडूने २७ धावा केल्या. रायुडूपाठोपाठ मोईन अलीही बाद झाला. त्याने ३ चौकार आणि २ षटकारांसह ४८ धावा केल्या. धोनी, शिवम दुबे स्वस्तात बाद झाल्यानंतर कप्तान जडेजाने फटकेबाजी केली. २० षटकात चेन्नईने हैदराबादसमोर ७ बाद १५४ धावा केल्या. जडेजाने २ चौकार आणि एका षटकारासह २३ धावांची खेळी केली. हैदराबादकडून सुंदर आणि नटराजन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
दोन्ही संघांची Playing XI
चेन्नई सुपर किंग्ज – रॉबिन उथप्पा, रुतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा (कप्तान), शिवम दुबे, एमएस धोनी (यष्टीरक्षक), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, महेश थिक्ष्णा, मुकेश चौधरी.
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कप्तान), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जानसेन, उमरान मलिक, टी. नटराजन.
महत्त्वाच्या बातम्या –
- …हा हल्ला संजय राऊतांनीच नियोजनबद्ध केलाय का?- प्रविण दरेकर
- आदर पूनावालांची मोठी घोषणा, बूस्टर डोसची ही असेल किंमत
- “याच्या पाठीमागे कोणकोण आहे, हे कळलं पाहिजे”- अजित पवार
- “झुंडीना भिणारा नाही, शूर सह्यांद्रीचा सिंह…”, जितेंद्र आव्हाडांनी लिहिली शरद पवारांवर कविता
- IPL 2022 : चालू सामन्यात फलंदाजानं घेतला टॉयलेट ‘ब्रेक’ अन्….! गुजरात-पंजाब मॅचमध्ये घडला ‘असा’ प्रकार; पाहा VIDEO
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

