🕒 1 min read
मुंबई : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच यावेळी त्यांनी राज्यातील मदरशांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली. या मुद्द्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरेंवर टीका केली. दरम्यान, आव्हाडांच्या टीकेवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना अविनाश जाधव म्हणाले की,‘जितेंद्र आव्हाडांना १९९९ नंतरचा इतिहास नीट माहिती नसेल तर त्यांना फक्त ठाण्यातला इतिहास सांगतो. ठाण्यात दोन मोठ्या दंगली मी त्यांच्यासमोर आणून देतो २००७-०८ ला राबोडीमध्ये झालेली आणि दुसरी भिवंडीमध्ये झालेली दंगल. यामध्ये आपल्या दोन पोलीसांना प्राण गमावावे लागले होते. आज त्यांच्या कुटुंबियांना काय वाटत असेल? याबद्दल आव्हाडांना कधी पुळका आला नाही.’ तसेच आव्हाडांना मशीद, भोंगा याबद्दल बोलल्यावर पुळका येतो, असेही जाधव म्हणाले.
दरम्यान, ‘राज ठाकरे यांनी मुंब्र्याबद्दल कारण नसताना जातीयवादी विधान केले. माझं राज यांना जाहीर आव्हान आहे की, त्यांनी माझ्यासोबत मुंब्र्यातील कोणत्याही मदरशात यावे. दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडून देईल. मुंब्र्यात काही शतक हिंदू मुसलमान प्रेमानी राहतात मुंब्र्याला बदनाम करू नका. कळवा-मुंब्रा ह्या मतदार संघात ६७% हिंदू आहेत आणि ३३% मुसलमान त्यात मी ७५००० मतांनी विजयी झालो कळव्यातून ३०००० ची आघाडी आणि मुंब्र्यातून ४५००० मतांची आघाडी.’ तसेच लोकं कामावर मतं देतात जाती पाती वर नाही. त्यासाठी १८ तास राबावे लागते. शेवटच्या माणसा पर्यंत पोहचावे लागते,’ असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
- “त्यांना भोंगा, मशीद, मुस्लमान अशा गोष्टी ऐकायला आल्या की…”; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेवर मनसेचे प्रत्युत्तर
- बाळासाहेबांनी मराठी भाषा व अस्मितेच्या रक्षणासाठीच शिवसेना काढली- संजय राऊत
- “अशा नतद्रष्टांच्या छाताडावर पाय ठेवून…”; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
- “लाव रे तो व्हिडीओ आणि आता …”, जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना जोरदार टोला
- “महाराष्ट्र पेटवू नका”, जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंना विनंती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
