🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात दुसरी पत्रकार परिषद घेतली. संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली. भाजपचे लोक काय मुंबईतील रस्त्यावर हातात कटोरा घेऊन भीक मागतात का? अशा शब्दात प्रश्न उभा करून संजय राऊतांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
‘किरीट सोमय्या यांनी एका केंद्रीय मंत्र्याबाबत 100 बोगस कंपन्यांची यादी दिलीय’. कुणी ढवंगाळे आहेत, ते भाजपच्या जवळ आहेत. त्यांच्या 75 बोगस कंपन्यांची यादी मी पाठवली आहे. त्याचं काय झालं? ईडीच्या सर्वाधिक कारवाई महाराष्ट्रात झाली आहे. असे संजय राऊत म्हणाले.
“आतापर्यंत महाविकास आघाडीच्या 14 लोकांवर कारवाई झालीय. भाजपच्या लोकांवर आयटी किंवा ईडीची रेड का नाही”? ते लोक काय रस्त्यावर कटोरा घेऊन भीक मागत आहेत का? अशी खोचक टीका संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर आजच्या पत्रकार परिषदेत केली.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
