🕒 1 min read
मुंबई : ईडीने गोरेगावमधील एका भूखंडाच्या फसव्या एफएसआय विक्रीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू आणि व्यावसायिक प्रवीण राऊत यांना काल(२ फेब्रु.)अटक केली आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत(Sachin Sawant) यांनी भाजपवर टिका केली असून राष्ट्रीय तपास यंत्रणा ‘विक्रम आणि वेताळ’च्या वेताळासारख्या आहेत, अशी खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
यासंदर्भात सचिन सावंत यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘राष्ट्रीय तपास यंत्रणा ‘विक्रम आणि वेताळ’च्या वेताळासारख्या आहेत. फरक हाच की विक्रम बोलला तर वेताळ खांद्यावरून उडून जायचा. मोदींचा वेताळ, मोदी सरकारच्या विरोधात बोलले कि बोलणाऱ्याच्या खांद्यावर बसतो.”तू बोला मैं चला” नव्हे “तू बोला मैं आया”! भाजप नेत्यांचा खांदा याला चालत नाही.’
राष्ट्रीय तपास यंत्रणा ‘विक्रम आणि वेताळ’च्या वेताळासारख्या आहेत. फरक हाच की विक्रम बोलला तर वेताळ खांद्यावरून उडून जायचा. मोदींचा वेताळ, मोदी सरकारच्या विरोधात बोलले कि बोलणाऱ्याच्या खांद्यावर बसतो."तू बोला मैं चला" नव्हे "तू बोला मैं आया"! भाजपा नेत्यांचा खांदा याला चालत नाही
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 3, 2022
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘वर्षानुवर्षे तो वेताळ झाडाला लटके. या वेताळाचा तपासही लटकलेला राहतो. संजय राऊत जी मोदी सरकार विरोधात बोलले. भावाला लगेच अटक. १ जाने २०२१ रोजी प्रवीण राऊतांची मालमत्ता जप्त केली. मग तपास वर्षभर का लटकवला? याच HDIL ने भाजपला २० कोटींची देणगी दिली त्यांच्या खांद्यावर बसणार नाही’, असेही सावंत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- परमबीर सिंहनंतर आता सीताराम कुंटेंचा खळबळजनक दावा; “मुख्यमंत्र्यांनी केलेल्या फोनमुळे..”
- “मराठी पाट्यांसाठी आग्रह धरणाऱ्या शिवसेनेने आपली सत्ता…”, भातखळकरांचा हल्लाबोल
- ‘मनसुख हिरेन हत्येच्या कटात परमबीर सिंहच मास्टरमाईंड’; अनिल देशमुखांचा जबाब
- कोव्हिशिल्ड लसीमुळे माझ्या मुलीचा मृत्यू; औरंगाबादच्या वडिलांची १ हजार कोटींची भरपाईची मागणी!
- खिशात देशी दारु आणि दारूच्या नशेत धूत… गोपीचंद पडळकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
