🕒 1 min read
मुंबई: मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या र्अथातच मुंबैबँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे निवडून आल्याने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मोठा धक्का समजला जातो आहे. त्यामुळे ही बँक भाजपच्या हातातून निसटली आहे. यावरूनच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचे या निवडणुकीसंबंधीच एका ट्वीटला प्रतिउत्तर देत टोला लगावला आहे.
‘जोर का झटका धिरेसे कसा असतो ते अर्ध्या हळकुंडानी पिवळे झालेल्यांना समजलं असेल. तेरे वार पर पलटवार हु मै …मुंबैबँक अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे.’ असे ट्वीट करत रुपाली पाटील ठोंबरे यांनी चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे.
जोर का झटका धिरेसे …
कसा असतो ते अर्ध्या हळकुंडानी पिवळे झालेल्याना समजलं असेल
तेरे वार पर पलटवार हु मै …#मुंबईबँक अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिद्धार्थ कांबळे यांची निवड pic.twitter.com/ctjhLTNJ9O— Rupali patil thombare (@Rupalispeak) January 14, 2022
चित्रा वाघ यांचे ‘ते’ ट्वीट-
‘मुंबै बँकेच्या निवडणूकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात सहकार पॅनेलचा विजय झाला. सर्वच २१ जागा जिंकल्या. मतदारांनी बँकेच्या कारभारावर विश्वास दर्शवलाय सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन! प्रवीण दरेकर यांचा तिन्ही पक्षांना ‘जोर का झटका धीरे से..!’ असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले होते. यावरच रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिउत्तर देत टोला लगावला आहे.
दरम्यान अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँगेसचे सिद्धार्थ कांबळे यांना ११ मते मिळाली तर भाजपच्या प्रसाद लाड यांना ९ मते मिळाली आहेत. भाजपकडे १० मते होती, विष्णू भुंबरे हे फुटले, त्यामुळे महाविकास आघाडीला ११ मते मिळाली. ही निवडणूक जिंकण्यासाठी राज्य सरकारने दबाव आणला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष लक्ष घालून सत्तेचा दुरुपयोग करून ही निवडणूक महाविकास आघाडीने जिंकली,असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- नोटीस देणे, ट्विट करणे, मिडियाबाजी ही निव्वळ स्टंटबाजी; करुणा मुंडेंचा रुपाली चाकणकरांना टोला
- “गिरे तो भी टांग उपर”, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल ‘
- कोणतीही कारवाई करण्यापूर्वी लोकांच्या रोजगाराचा प्रश्न लक्षात घ्यायला हवा- पंतप्रधान मोदी
- “उत्तरप्रदेशातील उपेक्षित, शोषित समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शिवसेना वचनबद्ध”
- नव्या गाण्यातील डान्सिंग स्टाईलमुळे गोविंदा झाला ट्रोल ; जाणून घ्या कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
