Share

“उत्तरप्रदेशातील उपेक्षित, शोषित समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शिवसेना वचनबद्ध”

Published On: 

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh tiket) यांची भेट घेतली. या भेटीनंतर अनेक राजकीय चर्चांना उधान आले असतानाच आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट करत उत्तरप्रदेशातील उपेक्षित, शोषित समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शिवसेना वचनबद्ध असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात मोठ्या राजकीय घडामोडी होण्याचे संकेत यातून मिळाले आहेत.

‘शिवसेना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची वचनबद्धता आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सामाजिक संकल्पच्या सुत्रानुसार उत्तर प्रदेशातील संपूर्ण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. उत्तर प्रदेशातील उपेक्षित, शोषित,वंचित आणि पीड़ित अशा प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. ‘ असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.

दरम्यान काल संजय राऊत आणि राकेश टिकैत यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अनेकांना उत्सुकता लागली होती. यावरच उद्धव ठाकरे यांनी मला महाराष्ट्रामध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे, अशी प्रतिक्रिया टिकैत यांनी दिली. आम्ही निवडणुकीमध्ये कोणालाही पाठिंबा देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र आजच संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटमुळे अनेक राजकीय चर्चाही रंगण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!