Share

नोटीस देणे, ट्विट करणे, मिडियाबाजी ही निव्वळ स्टंटबाजी; करुणा मुंडेंचा रुपाली चाकणकरांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना बोलून अर्थ नाही, कारण त्या काही करू शकत नाही. नोटीस देणे, ट्विट करणे, मिडियाबाजी ही निव्वळ स्टंटबाजी आहे. पण प्रत्यक्षात कृती करणे महत्वाचे असते, असे म्हणत करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना टोला लगावला आहे.

करुणा मुंडे पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यासोबतच त्यांनी दिशा सालीयन, पूजा चव्हाण, करुणा मुंडे या महिलांसोबत राज्यात काय झालं हे सर्वांनीच पाहिले. प्रश्न या तीन महिलांचाच नाही तर आजही महाराष्ट्रात अनेक महिलांसोबत अत्याचार होत आहे. असे म्हणत संताप व्यक्त केला. मात्र राजकीय क्षेत्रात अनेक महिला असून एकही महिला याविरोधात आवाज उठवीत नाही. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी करुणा मुंडे यांनी भाजपच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावरही निशाणा साधला. मी जेव्हा तुरुंगात होते तेव्हा एकाही महिलेने माझ्यासाठी आवाज उठवला नाही. एकमेव चित्रा वाघ यांनी माझ्यासाठी आवाज उठवला. मात्र तो ही फक्त मीडियापुरता. मी याला पब्लिसिटी स्टंट समजते. असे म्हणत त्यांनी चित्रा वाघ यांनाही टोला लगावला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!