Share

कोणतीही कारवाई करण्यापूर्वी लोकांच्या रोजगाराचा प्रश्न लक्षात घ्यायला हवा- पंतप्रधान मोदी

Published On: 

मुंबई : मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे राज्यात २४ डिसेंबरला रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु त्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील सातत्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी(१३ जाने.) पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी सध्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

यावेळी बोलत असतांना मोदी म्हणाले आहे,’आता आपल्याला दोन वर्षांचा साथीच्या रोगाशी लढण्याचा अनुभव आला असून कोणतीही कारवाई करण्यापूर्वी लोकांच्या रोजगाराचा प्रश्न लक्षात ठेवला पाहिजे. त्यामुळे, स्थानिक नियंत्रणाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना उपचार मिळतील याचीही काळजी घेतली पाहिजे. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी नाईट कर्फ्यू आणि वीकेंड कर्फ्यू जाहीर केला आहे’, असे मोदी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की,’ओमाक्रॉनबद्दलची शंका आता हळूहळू दूर होत असून आज भारताने कोविड लसीचा पहिला डोस सुमारे ९२ टक्के प्रौढ लोकसंख्येला दिला आहे. दुसऱ्या डोसच्या कव्हरेजमध्येही देश ७० टक्क्यांच्या आसपास पोहोचला आहे. १० दिवसांत भारतानेही सुमारे ७० टक्के बालकांचे लसीकरण केले आहे.’

दरम्यान, ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या बैठकीस गृहमंत्री अमित शाह(Amit Shah), केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया(Mansukh Mandvia), काँग्रेसशासित राज्याचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी(Charanjit Sing Channi), राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत(Ashok Gehlot) आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल(Bhupesh Baggel), महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!