मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची प्रकृती ठीक नसल्याने ते सध्या घरीच आहेत. मात्र अनेक बैठकांना त्यांनी ऑनलाईन हजेरी लावली आहे. असं असलं तरी गेल्या अनेक दिवसांपासून ते घरा बाहेर पडले नाहीत. हिवाळी अधिवेशन झाले त्याला देखील मुख्यमंत्र्यांनी हजेरी नव्हती लावली. यावरुन विरोधकांनी ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधला आहे.
भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुन्हा एकदा ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. चंद्रकांत पाटील ट्विट करत म्हणाले, मुख्यमंत्र्यांचं नक्की चाललंय तरी काय ? मंत्रालयात गैरहजेरी, अधिवेशनात गैरहजेरी आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीला गैरहजेरी ! राज्याच्या जनतेची काही काळजी आहे की नाही?, असा प्रश्न पाटलांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्र्यांचं नक्की चाललंय तरी काय ? मंत्रालयात गैरहजेरी, अधिवेशनात गैरहजेरी आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीला गैरहजेरी ! राज्याच्या जनतेची काही काळजी आहे की नाही ?
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 13, 2022
पुढे बोलताना पाटील म्हणाले, या कठीण काळात कुटुंब प्रमुखांनी सर्वात पुढे येऊन लढायला हवं, जनतेच्या समोर येऊन त्यांना धीर द्यायला हवा. मात्र लढायचं सोडा हे कुटुंब प्रमुख घराबाहेर एक पाउलसुद्धा ठेवत नाहीत. इतक्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गांभीर्यच कळत नाही, हीच फार गंभीर बाब आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांनी एक शेर ट्विट करत त्या शेरमधून ठाकरेंवार टीका केली आहे, मंजिल मिल ही जायेगी एक दिन, भटकते-भटकते ही सही । गुमराह तो वो है, जो घर से निकले ही नहीं! असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- कोरोना संदर्भात बैठकीनंतर पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय
- उत्तर प्रदेशातील भाजप मंत्र्यांच्या राजीनामा सत्रावर शरद पवार म्हणाले, “गोव्यातही हे…”
- ‘मराठीत फलक लावल्याने काय होणार?’; अभिनेता सुमित राघवनचा प्रश्न
- छत्रपती शिवरायांचे दर्शन होणार; स्वारी लवकरच संभाजीनगरला धडकणार, आ. अंबादास दानवेंनी दिली माहिती
- “दीदींच्या प्रकृतीत सुधारणा.. ; बहीण आशा भोसले यांनी दिली प्रतिक्रिया


