Share

नव्या गाण्यातील डान्सिंग स्टाईलमुळे गोविंदा झाला ट्रोल ; जाणून घ्या कारण

Published On: 

मुंबई : बॉलिवूडचा हिरो नंबर १ म्हणून अभिनेता गोविंदाला (Govinda) ओळखले जातो.  ८० ते ९०च्या काळातील एकसे एक हिट चित्रपट गोविंदाच्या नावे आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या डान्समुळे गोविंदा प्रसिध्द आहे. नुकतंच गोविंदाचे हॅलो हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याद्वारे तो म्युझिक व्हिडीओमध्ये आपली छाप पाडताना दिसत आहे. मात्र या गाण्यातील त्याच्या डान्स स्टाईलमुळे (dancing style) त्याला सोशल मीडियावर ट्रोल (trolling) केलं जात आहे.

दरम्यान गोविंदाने त्याच्या इन्स्टाग्रामवर म्युझिक व्हिडीओतील नवं गाणं शेअर केले आहे. या गाण्यात गोविंदासोबत अभिनेत्री निशा शर्मा (actress Nisha Sharma) डान्स करताना दिसत आहे. या गाण्यात गोविंदा त्याच्या ट्रेडमार्क स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे. मात्र या गाण्यातील त्याची ती जुनी स्टाईल पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तसेच या पोस्टवर प्रचंड प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.

https://www.instagram.com/tv/CYnMl_-pQJT/?utm_source=ig_web_copy_link

गोविंदा तुमच्या त्याच त्या स्टेप नकोत, ‘गोविंदा सर कृपया ९० च्या दशकातून बाहेर या,’ अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तसेच ‘हे जग २०२२ पर्यंत पुढे आले आहे, गाणं खूप छान आहे, छान दिसता, तसेच गोविंदा तुम्ही अजूनही ९० च्या दशकात आहात’ अशी कमेंट करत नेटकरी त्यांना ट्रोल करीत आहेत.

यापूर्वीही या म्युझिक अल्बमद्वारे गोविंदाचे दोन गाणे प्रदर्शित झाले आहेत. त्या व्हिडीओलाही लोकांनी फारशी पसंती दिली नव्हती. त्यानंतर आता या नवीन व्हिडीओद्वारे त्याला ट्रोल केले जात आहे. अभिनेता गोविंदाचा ‘हिरो नंबर वन’, ‘राजा बाबू’, ‘साजन चले ससुराल’ आणि ‘दुल्हे राजा’ (‘Raja Babu’, ‘Saajan Chale Sasural’ and ‘Dulhe Raja’) यासारखे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. मात्र गोविंदाच्या हॅलो गाण्यातील त्याच्या डान्स स्टाईलमुळे त्याला ट्रोल केलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!