Share

Bhagatsingh Koshyari | राज्यपालांविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेत काय आहेत आक्षेप?, जाणून घ्या

Published On: 

🕒 1 min read

Bhagatsingh Koshyari | मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल (Governor) भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे. एवढंच नाही तर त्यांना तातडीने पदावरुन हटवण्याची मागणी केली जात आहे. याबाबत एक याचिका देखील मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत काय आक्षेप घेण्यात आले आहेत हे जाणून घ्या.

काय आहे राज्यपालांबद्दल आक्षेप ?

– कलम 61 आणि 156 अंतर्गत राज्यपालांना हटवण्याचा निर्णय घेण्याची मागणी या याचिकेत केली आहे

– छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांचा, राज्यपालांनी अपमान केल्याचा ठपका

– अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कलम 19 अंतर्गत बंधने काय ?

– राज्यपालांनी जनतेतील एकोपा आणि शांतता बिघडवली आहे

– भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 61 आणि 156 अंतर्गत महाभियोगाची कार्यवाही करा

– उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका

राज्यपालांना हटवण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. मात्र, या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे. सुनावणी घ्यायला मुख्य न्यायाधीशांनी नकार दिला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्याबाबत जनहित याचिका कशी होऊ शकते ? राज्यपालांना विशिष्ट वक्तव्य करण्यापासून रोखलं जाऊ शकते का? असा सवाल न्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांना केला.

दरम्यान, नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली होती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!