🕒 1 min read
Bhagatsingh Koshyari | मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून राजकीय वातावरण प्रचंड तापलं असून त्यांना तातडीने पदावरुन हटवण्याची मागणी केली जात आहे. अशातच मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) या याचिकाबाबत मोठा निर्णय दिला आहे.
कांदिवलीतील रहिवासी दीपक जगदेव यांची वकील नितीन सातपुतेंमार्फत राज्यपालांविरोधात हायकोर्टात याचिका केली. मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर सकाळी ही याचिका सादर झाली.
राज्यपालांना हटवण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. मात्र, या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे. सुनावणी घ्यायला मुख्य न्यायाधीशांनी नकार दिला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्याबाबत जनहित याचिका कशी होऊ शकते ? राज्यपालांना विशिष्ट वक्तव्य करण्यापासून रोखलं जाऊ शकते का? असा सवाल न्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांना केला.
दरम्यान, नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena | कोल्हापूरात लोढा यांच्या विरोधात शिवसेनेची पोलीसात तक्रार, तर पोलिसांचा तक्रार नोंदवण्यास नकार
- Karnataka Govt | कर्नाटक सरकारनं पुन्हा महाराष्ट्राला डिवचलं; जतच्या दुष्काळी भागात पाणी सोडलं
- Ram Shinde | “रोहित पवार यांनी ‘ही’ योजना बंद ठेवण्याचं पाप केलं”, राम शिंदेंचा रोहित पवारांवर आरोप
- Supriya Sule | “…हे षडयंत्र कुठून होतं?”, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला खोचक सवाल
- Sadabhau Khot | “राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची अवलाद”वरुन वाद; सदाभाऊ यांचं स्पष्टीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
