Share

Karnataka Govt | कर्नाटक सरकारनं पुन्हा महाराष्ट्राला डिवचलं; जतच्या दुष्काळी भागात पाणी सोडलं

Published On: 

Karnataka Govt | सांगली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला आता सात दशकांहून जास्त काळ उलटला. मात्र, कर्नाटकसोबत असलेला सीमाप्रश्न अजूनही सुटलेला नाही.

सीमाभागातील अनेक गावांना महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा असल्याचा दावा सातत्याने महाराष्ट्राकडून केला जात आहे. बेळगावमध्ये यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकने महाराष्ट्राला पुन्हा एकदा डिवचलं आहे.

कर्नाटक सरकारने (Karnataka Govt) जतच्या 40 गावांवर दावा केला होता. अशातच त्यांनी आता जतच्या दुष्काळी भागात पाणी सोडलंय. कर्नाटक सरकारने जतच्या तिकोंडी भागात पाणी सोडलंय. जतच्या नागरिकांनी पाणी द्या नाहीतर आम्ही कर्नाटकमध्ये जाऊ, असा इशारा दिला होता. त्यानंतर कर्नाटक सरकारने थेट जतच्या दुष्काळी भागात पाणी सोडल्याने आता नवीन वाद निर्माण झालाय.

जत तालुक्यातील उमदी, तिकोंडी, उमराणीपाठोपाठ सिद्धनाथ गावातले गावकरी आक्रमक झाले आहेत. 42 गावांमध्ये पाणी द्या अशी प्रमुख मागणी हे करत आहेत. त्यातच आता कर्नाटकच्या तुबची बबलेश्वर पाणी योजना ओव्हरफ्लो करून दुष्काळी भागात कर्नाटकाने पाणी सोडलं आहे. दरम्यान, महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर बोलताना “आमची बाजू संवैधानिक आणि कायदेशीर आहे”, असं मत बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी मांडलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!