Share

Nagnath Kotapalle | ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक नागनाथ कोत्तापल्ले यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

Published On: 

🕒 1 min read

Nagnath Kotapalle | पुणे : मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक, प्रसिद्ध साहित्यिक (Senior Literary ) तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (नागनाथ कोत्तापल्ले) यांचे आज पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. कोत्तापल्ले यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.

नागनाथ कोत्तापल्ले यांचं शालेय शिक्षण मुखेडच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आणि बीए मराठीचे शिक्षण देगलूर महाविद्यालय येथे त्यांनी पूर्ण केले होते. मुंबईतले युवक साहित्य संमेलन, श्रीगोंद्यात आठवे ग्रामीण साहित्य संमेलन आणि कराडजवळ उंडाळे येथील साहित्य संमेलन, पुण्यातील पहिले औंध उपनगरीय मराठी साहित्य संमेलन 2003 राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन इत्यादी संमेलनांची अध्यक्षपदे नागनाथ कोतापल्ले यांनी भूषविली आहेत.

नागनाथ कोतापल्ले हे 1988 ते 95 या काळात मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू कार्यवह, 1995 ते 96 मध्ये साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या मराठी वाङ्मयकोशाचे समन्वय संपादकही होते. तसेच ‘प्रतिष्ठान’ या नियतकालिकाचे संपादक म्हणुनही त्यांनी वैविध्यपूर्ण काम केले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!