🕒 1 min read
Ajit Pawar | पुणे : इतिहास आणि त्याबद्दल नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या विधानानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केलं. हे वाद ताजे असतानाच पुन्हा एकदा भाजप मंत्र्यांने वादग्रस्त वक्तव्य केलंय.
भाजपचे पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीची तुलना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत केली आहे. लोढा यांच्या वक्तव्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील व्यासपीठावर होते. त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी (Ajit Pawar) मंगल प्रभात लोढा यांना खडे बोल सुनावले आहेत.
ते म्हणाले, “वाचाळविरांना आवरा हे सातत्याने सांगत आहे. एखाद्याला ठेच लागली तर दुसरा, ठेच लागू नये म्हणून प्रयत्न करतो. परंतु, यांच्यात चूका करण्याची स्पर्धा लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासमोर ही तुलना करण्यात आली. पण, आपल्यावर जवाबदारी काय आहे, कोणाची तुलना करतो, कसं वागलं आणि बोललं पाहिजे, याचं भान असायला हवं.” छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणाची तुलना होऊ शकते का? याचे तारतम्य या लोकांना राहिलं नाही आहे,” अशा शब्दांत अजित पवार यांनी लोढा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
नेमकं काय म्हणालेत लोढा?
मंगल प्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्रा सुटकेशी केली आहे. शिवराय आग्रामधून बाहेर पडले तसे शिंदे बाहेर पडले, असे लोढा म्हणाले. औरंगजेबाने शिवरायांना रोखलं तसे एकनाथ शिंदे यांनी देखील कोणीतरी रोखलं होतं. शिवराय स्वराज्यासाठी बाहेर पडले एकनाथ शिंदे महाराष्ट्रसाठी बाहेर पडले, असे वक्तव्य मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Aditya Thackeray | लोढांकडून शिवरायांच्या आग्रा सुटकेची तुलना एकनाथ शिंदेंशी, आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
- Eknath Shinde | “शेतकरी हेलिकॉप्टरने शेती करायला जाऊ शकत नाही का?”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
- Aditya Thackeray | “मिंधेगटाच्या गद्दारीची तुलना शिवरायांच्या पराक्रमाशी होऊच शकत नाही”, आदित्य ठाकरेंचा घणाघात
- Eknath Shinde | “ज्यांच्याकडे काही काम नाही ते…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा कुणावर?
- Mangal Prabhat Lodha | शिवरायांच्या आग्रा सुटकेची तुलना एकनाथ शिंदेंशी, भाजप मंत्र्याचे प्रतापगडावर वादग्रस्त विधान!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
