Share

Amol Mitkari | “मंगल प्रभात लोढा यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले” ; अमोल मिटकरी यांची टीका

Published On: 

Amol Mitkari | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या वक्तव्यामुळे भाजप बॅकफूटवर आली आहे. या दोघांच्या वक्तव्यावर भाजपचे बहुतांश नेते मौन बाळगून आहेत. पुन्हा एकदा भाजप मंत्र्यांने वादग्रस्त विधान केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील व्यासपीठावर होते. भाजपचे  पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीची तुलना एकनाथ शिंदे यांच्यासोबत केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी यांनी लोढांवर टीका केली आहे.

मंगल प्रभात लोढा यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व 40 आमदारांच्या बंडाशी करून पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.  शिवरायांचा इतिहास अपमानित करण्याचे नियोजनबद्ध कारस्थान आज परत एकदा जनतेसमोर आले.

ज्यांना महाराष्ट्र गद्दार म्हणून ओळखतो-

आदित्य ठाकरे म्हणाले, “ज्यांना महाराष्ट्र गद्दार म्हणून ओळखतो, ज्यांना महाराष्ट्र खोके सरकार म्हणून ओळखतो त्यांच्यासोबत तुलना महाराजांची करणं, हा काही चुकून आलेला शब्द नाही, हे पूर्णपणे प्लॅन आहे. हे पूर्ण या सरकारचा आणि पक्षाचा प्लॅन आहे की, महाराष्ट्राचे खच्चीकरण करावे. राज्यपाल जे बोलत आहेत. तेच हे मंत्री बोलले आहेत. ही सगळी वस्तूस्थिती लोकांसमोर आलेली आहे. म्हणजे तुम्ही महाराजांची तुलना अशी करता का? हा महाराजांचा अपमान आहे, महाराष्ट्राचा अपमान आहे.”

काय म्हणाले लोढा-

आज 363 वा शिवप्रताप दिन (Shiv Pratap Day) आहे. त्यानिमित्त प्रतापगडावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात  एकनाथ शिंदे यांच्या बंडांची छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्रा सुटकेशी तुलना करण्यात आली आहे. शिवराय आग्रामधून बाहेर पडले तशे शिंदे बाहेर पडले, असे लोढा म्हणाले. औरंगजेबाने शिवरायांना रोखलं तसे एकनाथ शिंदे यांनी देखील कोणीतरी रोखलं होतं. शिवराय स्वराज्यासाठी बाहेर पडले एकनाथ शिंदे महाराष्ट्रसाठी बाहेर पडले, असे वक्तव्य मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!