🕒 1 min read
Eknath Shinde | मुंबई : प्रतापगडावर ३६३ वा शिवप्रतापदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हजेरी लावली. मात्र, याच कार्यक्रमाला भाजप (BJP) नेते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी अनुपस्थिती लावल्याने एकनाथ शिंदे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने सर्वांनाच आनंद आहे. त्यांच्यासह सगळेच आनंदी आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
प्रतापगडाच्या संवर्धनासाठी तातडीने २५ कोटी रुपये देण्याचे निर्देश मी दिले आहेत. या किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. मला शिवाजी महाराजांना वंदन करण्याचे भाग्य लाभालं असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, गडकोट किल्ले शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे आहेत. या किल्ल्यांमधून प्रेरणा घेता येते. गडकोट किल्ल्यांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. त्यासाठी गड-कोट प्राधिकरण स्थापन करण्यात येईल, असं शिंदेंनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंत्री लोढांवर अजित पवार भडकले ; म्हणाले,
- Amol Mitkari | “मंगल प्रभात लोढा यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले” ; अमोल मिटकरी यांची टीका
- Mangalprabhat Lodha | मंगलप्रभात लोढा यांचं शिवरायांबाबतच्या केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, म्हणाले…
- Aditya Thackeray | लोढांकडून शिवरायांच्या आग्रा सुटकेची तुलना एकनाथ शिंदेंशी, आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
- Eknath Shinde | “शेतकरी हेलिकॉप्टरने शेती करायला जाऊ शकत नाही का?”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
