Share

Sunil Gavaskar | विराट-रोहितने सतत ब्रेक घेतल्यामुळे गावस्कर संतापले, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: गेल्या एक वर्षापासून टीम इंडियातील अनेक वरिष्ठ खेळाडू वर्क लोडचे कारण देत सतत ब्रेक घेत आहेत. यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat kohli), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यासारख्या खेळाडूंच्या समावेश आहे. अशा परिस्थितीत या खेळाडूंनी वारंवार ब्रेक घेतल्यामुळे भारतीय संघाचे माजी सलामवीर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) संतापले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या एक दिवसीय विश्वचषकापूर्वी कोणत्याही खेळाडूला विश्रांती देऊ नये, असे गावस्कर यांचे मत आहे. त्याचबरोबर किमान विश्वचषकापर्यंत संघातील वरिष्ठ फलंदाजाने एकत्र खेळावे, असे देखील ते म्हणाले आहे.

टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडिया लगेच न्युझीलँड दौऱ्यावर गेली. दरम्यान, दोन्ही संघामध्ये टी-20 सामन्यानंतर एक दिवसीय सामने खेळले जात आहे. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या या मालिकेमध्ये टी-20 संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ने केले होते, तर वनडे मालिकेत शिखर धवन (Shikhar Dhawan) संघाचे नेतृत्व करत आहे. तर, दुसरीकडे भारतीय संघातील विराट कोहली, रोहित शर्मा आणि के एल राहुल सारखे वरिष्ठ खेळाडू या मालिकेमध्ये खेळताना दिसत नाही.

पुढील वनडे विश्वचषक भारतामध्ये होणार आहे. ही स्पर्धा पुढच्या वर्षी पार पडणार आहे. अशा परिस्थितीत या स्पर्धेला वर्षापेक्षा कमी कालावधी आहे. वर्ल्ड कप तोंडाशी आल्यामुळे संघासोबत फारशी छेडछाड करू नये, असे गावस्कर यांचे मत आहे. कारण वर्ल्डकप पूर्वी संघात बदल झाले तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही. गावस्कर पुढे म्हणाले की, विश्वचषकासाठी आता खूप कमी काळ शिल्लक राहिला आहे. तर भारतीय संघातील वरिष्ठ फलंदाजांना विश्रांती देऊ नये. त्याचबरोबर भारतीय संघातील फलंदाजांनी जास्तीत जास्त एकत्र खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून त्यांच्यामध्ये समन्वय अधिक चांगला होऊ शकतो.

पुढे बोलताना गावस्कर म्हणाले की, मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये फलंदाजामध्ये चांगली भागीदारी होणे खूप महत्त्वाचे असते. चांगली भागीदारी होण्यासाठी फलंदाजामध्ये समांजसंपणा आणि समन्वय खूप महत्त्वाचे असते. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा फलंदाज जास्तीत जास्त एकत्र खेळतील.

वरिष्ठ खेळाडूंनी ब्रेक घेतल्यामुळे टी-20 मध्ये युवा खेळाडूंना भरपूर संधी मिळाले आहे. पण हा प्रयोग काही फारसा कामी आला नाही. त्यामुळे आता एक दिवशी विश्वचषकासाठी भारतीय संघाने या चुका पुन्हा करू नये, असे देखील गावस्कर म्हणाले. भारतने शेवटची आयसीसी स्पर्धा 2013 मध्ये जिंकली होती. तर, 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने एक दिवसीय विश्वचषक स्पर्धा आपल्या नावावर केली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!