Share

Raj Thackeray | “…भगतसिंह कोश्यारींचं अजूनही लग्न झालं नाही”, राज ठाकरेंचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

Raj Thackeray | मुंबई : मनसे अध्यक्ष राजे ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांचा खूब समाचार घेतला आहे. अलीकडेच राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. राज्यपालांच्या या विधानानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात आली होती.

यावेळी, त्या माणसाबद्दल काय बोलावं? मला हेच कळत नाही. मी त्यादिवशीच बोललो आहे की, ते एका विशिष्ट पदावर आहेत. म्हणून आपण त्यांना सोडून देतो. नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही. या राजकारणात अशी काही लोकं आहेत, ज्यांना पद येतं पण पोहोच येत नाही. त्यातली ही माणसं आहेत. त्यांना कधी कोणती गोष्ट बोलावी? कुठे बोलावी? आणि काय बोलावी, याचं भान नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी म्हटल्यानुसार, काही दिवसांपूर्वीही त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबतही आक्षेपार्ह विधान केलं होत. तसेच, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना उद्देशून राज्यपाल म्हणाले होते की, ही लहान-लहान लेकरं त्याकाळी लग्न कसं करत असतील? पण पूर्वीच्या काळात अशा पद्धतीने लहान मुलांची लग्न व्हायची. भगतसिंह कोश्यारींचं अजूनही लग्न झालं नसल्याचं राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, या बाबत बोलताना, मला तर असं वाटतं की अशा लोकांना म्हणजे राज्यपालांनाही कोणी स्क्रिप्ट देतं का? तुमचं सगळं लक्ष दुसरीकडे केंद्रीत करण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत का? बऱ्याचदा महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी हे असे प्रकार केले जातात, असं राज ठाकरे म्हणाले असून मुर्ख माणसं आहेत. आपल्या महाराजांना याने काही फरक पडत नाही. ही कोण माणसं आहेत? या लोकांना टेलिव्हिजनवर जागा देऊ नका. पण तुम्ही थांबत नाहीत, अशी टीका राज ठाकरेंनी राज्यपालांवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!