🕒 1 min read
Deepali Sayyed | मुंबई : दीपाली सय्यद यांनी मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणणार असून त्यांची बैठक आयोजित करणार असल्याची घोषणा दीपाली सय्यद यांनी केली होती. मात्र आता त्यांनीच एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
वर्षा बंगल्याबाहेर माध्यमांशी संवाद साधताना दीपाली सय्यद यांनी शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Nilam Gorhe), सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंवर (Rashmi Thackeray) टीका केली. मुंबई महानगरपालिकेचे (BMC) खोके वेळेवर मातोश्रीवर पोहचत नसल्याची खंत रश्मी वहिंनीना असल्याचे आरोप त्यांनी केलेत.
त्या म्हणाल्या, नीलम गोऱ्हे, सुषमा अंधारे हे चिल्लर आहेत. खोक्यामागील सूत्रधार रश्मी ठाकरे असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबई महानगरपालिकेमधून येणारे खोके वेळेवर मातोश्रीवर पोहचत नाहीत. याची खंत रश्मी वहिनींना जाणवत असल्याचे दीपाली सय्यद यांनी म्हटले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्याला शिवसेनेत आणलं होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर उभे राहणं कर्तव्य आहे, असे दीपाली सय्यद (Deepali Sayyed) यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, “संजय राऊत हे पक्षफुटीसाठी जबाबदार आहेत. संजय राऊत यांना त्यांच्या पापाची शिक्षा झाली आहे. पक्ष तोंडाने कसा फोडला जातो, याचं उत्तम उदाहरण संजय राऊत आहेत.” संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले असल्याचंही दीपाली सय्यद (Deepali Sayyed) यावेळी बोलताना म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | ” राऊतांच्या जामिनाला स्थगिती द्या, मोठी नावं गुतली आहेत”; ईडीची कोर्टात मागणी
- Bharat Jodo Yatra | महाविकास आघाडीचे ‘हे’ बडे नेते होणार भारत जोडो यात्रेत सहभागी, कोण अन् कधी जाणून घ्या
- Deepali Sayyed | “पक्ष तोडांने कसा फोडतात, याचं उदाहरण…”; दीपाली सय्यद यांचा संजय राऊतांवर निशाणा
- Sanjay Raut | मोठी बातमी! संजय राऊतांचा जामीन अर्ज अखेर मंजूर
- Deepali Sayyed | अखेर दिपाली सय्यद यांचा शिंदे गटात प्रवेश, म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
