🕒 1 min read
Sanjay Raut | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. मागील सुनावणी २ नोव्हेंबर रोजी पार पडली होती. यावेळी राऊतांच्या जामिनासंदर्भात ईडीने लेखी उत्तर सादर केलं होतं. जामिनावरील निकाल न्यायालयानं राखून ठेवला आहे. संजय राऊतांना कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अटक केली होती. विशेष म्हणजे प्रविण राऊत (Pravin Raut) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीनावर एकाच दिवशी 9 नोव्हेंबरला कोर्ट निर्णय देणार आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार असून राऊत यांना दिलासा मिळेल की पुन्हा त्यांची रवानगी तुरुंगात होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. राऊत यांचे अॅड. अशोक मुंदरंगी यांचा या प्रकरणातील युक्तिवाद पूर्ण झाला आहे.
पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरा ईडीनं अटक केली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली होती. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करुन सर्व व्यवहार करत होते असं ईडीने म्हटलं आहे. या संदर्भात कोर्ट आज काय निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “या मंत्र्यांना हाकला, नाहीतर…” – उद्धव ठाकरे सत्तारांवर कडाडले
- Vijay Shivtare | “सरकार बनवण्यासाठी अजित पवार सकाळी गेले होते तेव्हा..”, विजय शिवतारेंचा सुप्रिया सुळेंना सवाल
- MNS | “राष्ट्रवादी XXची औलाद”, मनसेच्या ‘या’ नेत्याची जीभ घसरली
- Amol Mitkari । ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादावरून अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना डिवचलं; म्हणाले,
- Sushma Andhare । “सत्तेचा केवढा माज म्हणावा की…”; सुषमा अंधारेंचा सत्तारांवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
